Vasant More  Saam TV
मुंबई/पुणे

''वसंत मोरेंचा मान-सन्मान जपला जाईल, राष्ट्रवादीत यावं''; मोरे म्हणाले मी...

राष्ट्रवादी आणि शिवसेना वसंत मोरेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

अश्विनी जाधव - केदारी

मुंबई : मनसेचे पुणे शहरध्याक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली गेली आहे. राज्यातील सर्वच पक्ष वसंत मोरेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी इच्छूक आहेत. आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांना खुलं आवाहन केले आहे.

वसंत मोरे (Vasant More) यांचा राष्ट्रवादीमध्ये मान, सन्मान जपला जाईल. त्याचबरोबर ज्या कोणत्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या असतील त्यांनीही पक्षात यावं असं आवाहन प्रशांत जगताप यांनी केले आहे. वसंत मोरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मी अजूनही राज ठाकरेंचा मनसैनिक आहे. मी साईनाथ बाबर यांच्यासोबत काम करेल असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना वसंत मोरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेबाबत वसंत मोरे (Vasant More) यांनी वेगळी भूमिका घेतली होती. ही भूमिका घेणं त्यांना चांगलच महागात पडलं आहे. कारण आज मनसेने पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंच मोरे यांना हटवलं असून त्या जागी राज ठाकरे यांच्या आदेशानं नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची पुणे शहराध्यपदी निवड करण्यात आली आहे.

अशातच आता मनसेकडून डावललेल्या वसंत मोरेंना (Vasant More) आपल्या पक्षात घेण्यासाठी राजकीय पक्ष चर्चा करत असल्यातं समोर येत आहे. याबाबत त्यांनी स्वत: सगळ्या पक्षांनी ऑफर दिली असल्याचं सांगितलं असून त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्यक्ष भेटले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता वसंत मोरे यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Maharashtra Live News Update: नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Mosquito Safety: डासांसाठी अगरबत्ती घेताय? त्या आधी ही माहिती वाचाच

SCROLL FOR NEXT