Purnekar family claims CCTV footage identifies fifth accused saam tv
मुंबई/पुणे

Pradeep Purnekar Case: 5वा आरोपी राजेंद्र शिंदेच; २६ दिवसांनंतर पूर्णेकर हत्या प्रकरणात नवी अपडेट; हॉटेलमधला CCTV व्हिडिओ आला समोर

Pradeep Purnekar Case Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात २६ दिवसांनंतर नवी अपडेट समोर आलीय. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिल्याचा दावा पूर्णेकर कुटुंबीयांनी केला असून पाचव्या आरोपीच्या अटकेची मागणी केलीय.

Bharat Jadhav

  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजबाबत कुटुंबीयांचा दावा.

  • हॉटेल किंवा कॅफेमधील फुटेज पोलिसांना दिलेत.

  • संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली

ठाण्यातील ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात २६ दिवसानंतर नवी अपडेट हाती आलीय. या हत्याप्रकरणातील पाचव्या आरोपीबाबतचा पुरावा पूर्णेकर यांनी पोलिसांना दिलाय. दरम्यान हा पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच असल्याचं दावा प्रदीप पूर्णेकर यांचा राम पूर्णेकर आणि पूर्णेकर कुंटुंबियांनी केलाय. राम पूर्णेकर यांनी एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिलेत. या फुटेजमध्ये राम शिंदे दिसत आहेत. त्यावरून पाचवा आरोपी हा राम शिंदेच आहे, असा दावा पूर्णेकर कुटुंबियांनी केलाय.

याप्रकरणातील अधिक माहितीनुसार, ठाण्यातील एका कॅपेमधील हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे, यात राम शिंदे इतर आरोपींसोबत दिसत आहेत. त्याचदरम्या त्यांनी प्लॅन केला असावा. असा दावा राम पूर्णेकर यांनी केलाय. ठाण्याचे माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि राम शिंदे यांना त्वरीत अटक करावी, अन्यथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करू, असा इशारा राम पूर्णेकर यांनी दिलाय.

दरम्यान या हत्या प्रकरणाला २६ दिवस पूर्ण झाली आहेत, तरीही या प्रकरणी पोलिसांनी एफआयआरमध्ये अद्यापही संशयित आरोपी राम पूर्णेकर आणि मिनाक्षी शिंदे यांचे नाव नोंदवलं नाहीये.

मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे

पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्या शिंदे याच्यासह आणखी चार जणांचा समावेश आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच कट रचून प्रदीप पूर्णेकर यांची हत्या केल्या आरोप केलाय. या आरोपांनंतर पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांना सातवेळा चौकशीसाठी बोलवल्याची माहिती आहे.

राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याशी संबंधित दोन व्हिडिओ जारी करत एकच खळबळ उडवून दिलीय. पूर्णेकरांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये आरोपी निखील यादव बंदूक चालवताना दिसतोय. तर त्याच्या बाजूला राजेंद्र शिंदे हेदेखील उभे असल्याचे दिसत येत आहे. व्हायरल व्हिडिओ मुळशीतील असल्याचे सांगितले जातंय. संबंधित व्हिडीओ विशेष तपास पथकाच्या हाती लागलाय. पोलिसांनी या व्हिडिओप्रकरणी मुळशी येथे जाऊन चौकशी केली. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात हा मोठा दुवा असल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cordelia Sky: कॉर्डेलियाची नवी क्रूझ सुरू! स्विमिंग पूल, जकूझी आणि मनोरंजनासह मिळणार अनेक सुविधा

Private Part Hair Removal: महिलांनो, प्रायव्हेट पार्ट्सचे केस काढताना करू नका 'या' चुका; लक्षात ठेवा ७ गोष्टी

Silver Rate Today: चांदी तब्बल ₹२.२३ लाखांनी स्वस्त! मग धनत्रयोदशीला चांदी खरेदी करायची? तज्ज्ञ काय सांगतात?

Antibiotic Side Effects : अँटिबायोटिक्स घेतल्यावर पचनक्रिया का बदलते? 'या' महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: जरांगेंच्या आरोपाप्रकरणी SIT स्थापन करा

SCROLL FOR NEXT