डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत असल्याने सध्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली - डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन महामार्ग खोणी ते नेवाळी नाका दरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळा सरला असला तरी देखील खड्ड्यांमधून वाहनचालकांची मुक्तता झालेली नाही. हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत असल्याने सध्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र प्रशासन आणि सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करत आहे.

डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोड हा बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, तळोजा आणि ग्रामीण भागाला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. मात्र या खोणी ते नेवाळी नाका दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत आणि हेच खड्डे आता अपघातांना निमंत्रण देत आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ या महामार्गावरून होत असते. तर दिवसा ठाणे, नवी मुंबई पासून कामगार वर्ग  बदलापूर, अंबरनाथ परिसरात ये-जा करत असतो.त्यामुळे रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवणे आवश्यक आहे.

हे देखील पहा -

रात्रीच्यावेळी खड्डे दिसत नसल्याने अपघात या रस्त्यावर होत असतात. तर सकाळच्या वेळी याच खड्ड्यामुळे ट्रॅफिक जाम होते.यापूर्वी पावसाळ्यात नेवाळी मधील वाहतूक पोलिसांनी हे खड्डे बुजवले होते. मात्र आता पुन्हा खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांचा त्रास हा वाहतूक पोलिसांना देखील सहन करावा लागत आहे.दरम्यान वाहनचालकांना खड्डेमुक्त प्रवासामधून कधी मुक्तता मिळणार असा प्रश्न मात्र कायम अनुत्तीतच राहिला आहे. त्यामुळे आतातरी प्रशासन आणि सत्ताधारी या कडे लक्ष देणार का हे पहावे लागेल.

दरम्यान या रस्त्यावरील काटई नाका ते खोणी फाटा या रस्त्याच्या कामावरून शिवसेना आणि मनसे मध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. याच रस्त्याच्या निधीबाबत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आधी प्रेसनोट काढत सांगितले की उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अनबलगन यांच्याकडे रस्त्याच्या उभारणीसाठी मागणी केली होती. अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एमआयडीसी प्रशासनाने या रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेला मंजुरी दिली असून २३.४९ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आहे.

मात्र आता मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेला पत्रव्यवहार दाखवत आणि पाठपुरावा करून निधी मंजूर मीच करून आणला असे सांगितले. तसेच मनसे आमदर यांनी नाव न घेता सत्ताधारी नेत्यांना टोला सुद्धा लगावला.मात्र याच रस्त्यावरील खोणी ते नेवाळी नाका दरम्यान खड्डे पडले असल्याने दोन्ही पक्षातील नेते लक्ष देणार का हे पाहावे लागेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

SCROLL FOR NEXT