Ulhasnagar News X
मुंबई/पुणे

Crime News : बायको-मुलीची हत्या, मग स्वत:ला संपवलं; मृत्यूपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...

Ulhasnagar News : उल्हासनगर कॅम्प नंबर १ मध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृत्यूमागील कारण समोर आले असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Yash Shirke

अजय दुधाणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याची पत्नी आणि मुलीची हत्या करुन स्वत:चे जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर १ परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन पहुजा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पवनने त्याची पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी यांची हत्या केली. त्यानंतर राहत्या घरात आत्महत्या केली. जीवन संपवण्यापूर्वी पवनने मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला. आर्थिक विवंचनेतून हे कृत्य केल्याची कबुली पवनने मोबाइलमधील व्हिडीओद्वारे दिली.

पवन हा सोनार गल्ली परिसरात एका दुकानामध्ये कामाला होता. काबाडकष्ट करुन पवन त्याचा संसार चालवत होता. गुरुवारी (१५ मे) मध्यरात्रीच्या वेळेस त्याने त्याची पत्नी आणि लहान मुलगी यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:ला देखील संपवले. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नी आणि मुलीची हत्या करुन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आर्थिक अडचणींमुळे या व्यक्तीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

SCROLL FOR NEXT