Poor air quality in Mumbai delhi health emergency declared schools shut next two days Saam TV
मुंबई/पुणे

AQI Delhi And Mumbai : मुंबईची हवा बिघडली, दिल्लीत तर श्वास घेणं कठीण; शाळांना २ दिवस सुट्टी

Mumbai-Delhi Air Pollution: दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावल्याचं लक्षात घेता सरकारने शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

Satish Daud

Mumbai-Delhi Air Pollution

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. तापमानामध्ये होणाऱ्या चढउतारामुळे मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आलं असून चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावल्याचं लक्षात घेता सरकारने शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तापमानामध्ये होणाऱ्या चढउताराचा परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता चांगलीच खालावली आहे. पहाटेच्या वेळी वातावरणात आर्द्रता असली, तरी दिवसभर ही आर्द्रता राहत नाही. परिणामी मुंबईवर दिसणारी धुरक्याची चादर सातत्याने टिकून आहे.

मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांकानुसार, गुरुवारी सकाळी वरळी येथे २५४, वांद्रे-कुर्ला संकुल येथे २०१, कुलाबा येथे २०३ अशा निर्देशांकांची नोंद झाली. हे निर्देशांक हवेची वाईट गुणवत्ता नोंदवत होते. त्यानंतर दुपारनंतर हवेची दिशा बदलल्यावर गुरुवारी संध्याकाळी केवळ कुलाबा येथे हवेची गुणवत्ता वाईट होती.

मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी ही आतापर्यंत चांगल्या श्रेणीमध्ये गणली जात होती. मात्र, आता हीच हवा मॉडरेट श्रेणीमध्ये गणली जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा तर नाही ना? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर मुंबईकरांना आता काळजी घेण्याची गरज आहे.

दिल्लीत शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

दिल्लीत दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. वाढते वायू प्रदूषण लहान मुले आणि वृद्धांसाठी धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे सरकारने सर्व प्राथमिक सरकारी आणि खाजगी शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. फक्त पाचवीपर्यंतच्या शाळा बंद राहतील, असं केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

Crime News: आधी बुरखाधारी महिलेनं थांबवलं, नंतर नमाज वाचण्यासाठी जबरदस्ती अन्...; पालघरमधील महाविद्यालयात नेमकं काय घडलं?

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

SCROLL FOR NEXT