पूजा चव्हाण प्रकरण....आई-वडिलांकडून क्लीनचिट ( पहा व्हिडिओ ) Saam Tv
मुंबई/पुणे

पूजा चव्हाण प्रकरण....आई-वडिलांकडून क्लीनचिट ( पहा व्हिडिओ )

घटनेच्या सहा महिन्यानंतरही पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - पूजा चव्हाण Pooja Chavan आत्महत्या प्रकरणी पुणे Pune पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा क्‍लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केलेला नाही. अजूनही संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पुणे पोलिसांनी Pune Police स्पष्ट केले आहे. घटनेच्या सहा महिन्यानंतरही पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. दरम्यान, पुजाच्या आई-वडीलांनी आत्महत्या Suicide प्रकरणी कोणावरही आरोप केले नाहीत, आत्महत्येनंतर घडलेला प्रकार हा राजकीय नाट्य आहे असा जबाब वानवडी पोलिसांना दिला आहे.

हे देखील पहा -

७ फेब्रूवारीला पूजा चव्हाणने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी संजय राठोड Sanjay Rathod यांना धारेवर धरले होते. त्यानंतर राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे या प्रकरणाबाबत वानवडी पोलिसांकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून तपास सुरू आहे असे उत्तर देण्यात आले.

याच प्रकरणामध्ये पूजा चव्हाणच्या आई-वडीलांनी १५ दिवसांपुर्वी वानवडी पोलिस ठाण्यात येऊन आपला जबाब नोंदविला. त्यामध्ये आपल्या मुलीच्या आत्महत्येबाबत कोणालाही जबाबदार धरले नाही, तसेच मुलीच्या मृत्युनंतर घडलेला प्रकार हा राजकीय नाट्य आहे. असे त्यांनी आपल्या जबाबामध्ये नोंदविले आहे. त्याआधारेच राठोड यांना क्‍लिन चीट मिळाल्याची अफवा पसरली. तेवढ्यावर न थांबता काही दिवसांपासून राठोड यांची मंत्रीमंडळात पुन्हा वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT