Bhsakar Jadhav Bhsakar Jadhav
मुंबई/पुणे

Bhaskar Jadhav : शिवसेनेची तोफ भास्कर जाधव विधानसभेत दिसणार नाहीत? पायऱ्यांना नमस्कार करुन निघाले; नेमकं काय घडलं? VIDEO

Political News : भास्कर जाधव आता विधीमंडळात पुन्हा दिसतील की नाही असा प्रश्न उपस्थित झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये आमदार भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर होतं. कोकण असो किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना आपल्या शाब्दिक हल्लाने अंगावर घेतलं. विधीमंडळातही त्यांची आक्रमक अनेकांनी पाहिली. मात्र तेच भास्कर जाधव आता विधीमंडळात पुन्हा दिसतील की नाही असा प्रश्न उपस्थित झालं आहे.

उद्या गुडी पाडव्याची सुट्टी असल्याने आणि पुढील काळात सभागृहात बसण्याची इच्छा नसल्याने मी निघून जात आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांचं यावेळी दर्शन घेतलं. अधिवेशन काळात बोलू न दिल्याने आणि कोणतीही लक्षवेधी न लावल्याने जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Political News)

मी विधीमंडळात येणार नाही कारण माझी इच्छा राहिली नाही. मनात अत्यंत वेदना आहे. मी एकही दिवस अधिवेशनाचा चूकवत नाही. मला जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाहीये. मी नियमानं बोलण्याच प्रयत्न करतोय. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही.त्यामुळे मनात अत्यंत वेदना आहेत, असं भास्कर जाधव म्हणाले.

शेतकरी आज संकटात आहेत. सातत्याने त्यांना अवकाळी पाऊस, गारपीट, शेतमालाला भाव नाही. यामुळे खचलेले शेतकरी टोकाचे निर्णय घेऊन जीवन संपवतात. त्यांचे प्रश्न मला विधीमंडळात मांडायचे होते. हे सरकार संवेदनाहीन आहे. त्यामुळे या सरकारला संकटात असलेल्या शेतकऱ्यांचं काहीही देणंघेणं नाही, असंही भास्कर जाधव म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT