Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Political News : 'जनता दूधखुळी नाही, सगळ्याचा हिशोब होणार...'; भाजपच्या पोस्टरवरुन ठाकरे गटाचा CM शिंदेंवर निशाणा

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवामहल विधानसभा क्षेत्रातील भाजप उमेदवार बालमुकुन्द आचार्य यांच्या प्रचारासाठी गेले होते.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

देशात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्ष मैदानात आहेत. राज्यातील बडे नेते देखील निवडणुकीच्या प्रचारात जात आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. मात्र तेथील एका बॅनरवरुन राज्यातील राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवामहल विधानसभा क्षेत्रातील भाजप उमेदवार बालमुकुन्द आचार्य यांच्या प्रचारासाठी गेले होते. तेथे दौऱ्याच्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा करण्यात आला आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांवर सडकून निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन ट्वीट करत म्हटलं की, "पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला... आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात 'हिंदुहृदयसम्राट' फक्त एकच.... वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT