Subhash Desai Saam TV
मुंबई/पुणे

Subhash Desai Reaction: मुलाचं शिंदे गटात प्रवेश करणं क्लेशदायक, सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपली बडवे

Mumbai News: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुंबई सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशावर सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. (Political News)

शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, असं सुभाष देसाई म्हणाले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'वॉशिंग मशीनमध्ये ज्यांना जायचे आहेत, ते जाऊ शकतात. सुभाष देसाई आज देखील शिवसेनेत आहेत. जेव्हा ४० गद्दार पाठीत खंजीर खूपसत जातात, तो धक्का होता. पण आम्ही उभे राहिलो. अंगावर वार होत आहेत, तरी देखील आम्ही उभे आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT