Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: संजय राऊतांचं हक्कभंग नोटीसला उत्तर, काय म्हणाले वाचा सविस्तर

Political News: आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा संजय राऊतांनी दावा केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Mumbai News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग नोटीसीला उत्तर दिलं आहे. आपण केलेलं विधान हे विधीमंडळाला नाहीतर विशिष्ट गटाला उद्देशून बोललो आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा संजय राऊतांनी दावा केला आहे. विधीमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी नोटीस बजावण्यात आली होती.

संजय राऊत यांनी नोटीसीला उत्तर देताना म्हटलं की, मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून हे वक्तव्य एका विशिष्य गटापुरतं होतं. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासू पाहावं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Political News)

संजय राऊत यांनी विधिमंडळाला 'चोरमंडळ' असं म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला होता.पक्ष, धनुष्यबाण चिन्ह चोरणे आणि पुन्हा आम्हीच शिवसेना असल्याचे सांगितलं गेले. त्यामुळे एक विशिष्ट गट शिवसेना आमची असल्याचे सांगतोय, त्यांना मी 'चोरमंडळ' म्हटल्याचं राऊतांनी आधीच स्पष्ट केलं होतं.

विधिमंडळाने संजय राऊतांना ४८ तासांमध्ये आपलं म्हणणं लेखी मांडण्याची नोटीस दिली होती. शुक्रवारी (३ मार्च) संध्याकाळी संजय राऊतांची खुलासा सादर करण्याची मुदत संपली होती. मात्र आज त्यांनी आपलं उत्तर सादर केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT