Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Political News : मोठी बातमी! राज ठाकरे नंतर आता शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पडद्यामागे काय घडतंय?

Sharad Pawar meets CM Eknath Shinde : राज ठाकरे यांच्यानंतर आता शरद पवार देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. आज शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.

Satish Daud

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी यांच्यात सुरू असलेला संघर्ष, तसेच राज्यात निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यावर करण्यासाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील वर्षा या शासकीय निवास्थानी दाखल झाले आहेत. सध्या राज ठाकरे त्यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे. अशातच राजकीय वर्तुळातून आणखी मोठी घडामोड समोर आली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यानंतर आता शरद पवार देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. आज शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. या भेटीत मराठा आणि ओबीसी यांच्यातील आरक्षणाचा प्रश्न तसेच राज्यातील इतर राजकीय मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या, राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावरून विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सह्याद्री अतिथीगृहावर पोहचले होते. यावेळी शिंदे आणि पवार यांच्यात महत्वाची चर्चा देखील झाली होती.

दरम्यान, आज पुन्हा एकदा शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे राज ठाकरे आणि त्यांचे शिष्टमंडळ सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यातील महत्वांच्या विषयावर चर्चा करीत आहेत.

या शिष्टमंडळात राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या भेटीनंतर राज ठाकरे माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update : ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT