IPS Suspend  Saam Tv
मुंबई/पुणे

विधानपरिषदेत महायुतीत खडाजंगी; उपसभापती गोऱ्हेंकडून बड्या IPS अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश, पोलीस दलात खळबळ

Satara sp suspend : विधानपरिषदेत महायुतीत खडाजंगी पाहायला मिळाली. यानंतर उपसभापती गोऱ्हे यांनी बड्या IPS अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

Vishal Gangurde

विधीमंडळात साताऱ्याच्या मुद्द्यावरून महायुतीत खडाजंगी

उपसभापती गोऱ्हे यांच्याकडून पोलीस अधीक्षक यांच्या निलंबनाचे निर्देश

निलंबनाच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या राड्यावरून विधानसपरिषदेत महायुतीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. साताऱ्यात त्या दिवशी घडलेल्या राड्यावरून विधीमंडळात मंत्री शंभुराज देसाई यांनी पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी पोलीस अधीक्षक घरगड्यासारखे वागल्याचा आरोप केला. त्यानंतर उपसभापती डॉ. नीलन गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

साताऱ्यात शुक्रवारी जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड पार पडली. भाजपकडे संख्याबळ नसताना भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाला. या निवडीदरम्यान झालेल्या गोंधळात मंत्री शंभुराजे देसाई यांना दुखापत झाली. या निवडीदरम्यान पोलिस बळ आणि प्रशासनाला हाताशी धरून निवड केल्याचता आरोप मंत्री देसाईंनी केला. यावेळी देसाई यांनी पोलिसांनी धक्काबुक्की करत २ सदस्यांना ओढून घेऊन गेल्याचा आरोप केला.

निवडीवेळी मंत्री देसाई यांना दुखापत झाली. तर सातारा पोलीस अधीक्षक घरगड्या सारखी वागल्याचा आरोप केला. हाच आरोप आज सोमवारी मंत्री शंभुराज देसाई यांनी विधीमंडळात पुन्हा केला. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले.

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'सातारा पोलीस अक्षीक्षक तुषार दोषी यांचं निलंबन करा. त्या दिवशीच्या घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज मागवावे. त्याचे फुटेज माध्यमांकडे असू शकतात'. मंत्री शंभुराज देसाई यांच्या तक्रारीनंतर गोऱ्हे यांनी हे निर्देश दिले.

नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. जयकुमार गोरे म्हणाले, 'मंत्री देसाई यांच्या तक्रारीच्या आधारावर कारवाई करत आहात. तीच वस्तुस्थिती मी देखील सांगत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना प्रशासनाची इमारत उघडून आत कोण गेलं, याची चौकशी झाली पाहिजे. तिथे कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला, याचीही चौकशी झाली पाहिजे. ही परिस्थिती निर्माण का झाली, त्याचीही चौकशी व्हावी. पोलिसांना तपास करायचा होता. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला संरक्षण घेऊन इमारतीत घेऊन जात असाल. तर हे कोणत्या कायद्यात बसते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Keratin vs Hair Botox: केराटिन आणि हेअर बोटॉक्समध्ये नेमका काय फरक? केसांसाठी काय ठरतं फायदेशीर?

14.22 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ; मुख्यमंत्री होताच घेतला गेमचेंजर निर्णय

Teacher Dies : हळहळ! जनगणनेची माहिती घेतानाच शिक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Cockroach Janata Patry: सोशल मीडिया अकाउंट बंद होताच कॉक्रोच जनता पार्टीनं उचललं मोठं पाऊल

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

SCROLL FOR NEXT