Palghar, Tandulwadi Fort saam tv
मुंबई/पुणे

Palghar News : तांदुळवाडी किल्ल्यावर वाट चुकलेल्या ट्रेकर्सना ग्रामस्थांसह पाेलिसांनी दाखवली दिशा

तांदुळवाडी किल्ल्यावर येणाऱ्या ट्रेकर्सनी येथील निसर्गात रमून न जाता वेळीच खाली उतरावं असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.

रुपेश पाटील

Palghar News : पालघर पूर्वेस असलेल्या तांदुळवाडी किल्ल्यावर (tandulwadi fort) ट्रेकिंगसाठी (trekking) आलेले मुंबईकर वाट चुकले. त्यामुळे ते खूप घाबरले हाेते. त्यांनी पाेलिस मुख्यालयात फाेन करुन कंट्राेल रुमला माहिती दिली. त्यानंतर पाेलिसांनी (police) ग्रामस्थांच्या मदतीने आठही मुंबईकरांची (mumbai) सुटका केली. (Maharashtra News)

पालघर पूर्वेस तांदुळवाडी किल्ला आहे. येथे ट्रेकिंगसाठी राज्यभरातील लाेक येत असतात. या ठिकाणी मुंबईतील आठ पर्यटक ट्रेकिंगसाठी आले हाेते. यामध्ये पाच महिला (women) आणि तीन पुरुषांचा समावेश हाेता. त्यातील तीन जण वैद्यकीय अधिकारी हाेते.

हे आठही जण अंधार होई पर्यंत तांदुळवाडी किल्ल्यावरच होते. अंधार पडल्याने त्यांना किल्ल्यावरुन उतरण्यासाठी रस्ता सापडत नव्हता. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली. अखेर उशिरा या पर्यटकांनी पालघर कंट्रोल रूमला फोन करून मदत मागितली. त्यानंतर त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांनी आणि स्थानिक नागरिकांच्या (citizens) मदतीने सुखरूप किल्ल्यावरुन खाली आणण्यात आले. या पर्यटकांनी पोलीस आणि स्थानिकांचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT