Mumbai fake notes factory Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

Mumbai Fake Notes Factory: वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात धाड टाकून पोलिसांनी बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

Satish Daud

Mumbai BKC Fake Notes Factory

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात धाड टाकून पोलिसांनी बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक देखील करण्यात आली आहे.

नौशाद शाह आणि अली सय्यद, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून १००, २००, ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यभरात बेनामी रोकड सापडण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे पोलीस अलर्ट झाले असून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अशातच बीकेसी येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

याठिकाणी धाड टाकून पोलिसांनी बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा जप्त केला. सध्या पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या बनावट नोटा कुठे वितरीत केल्या जात होत्या, या सगळ्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

ऐरोलीत दीड कोटींची रोकड जप्त

निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने शनिवारी (ता. ४) ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त केली. दुधाच्या टेम्पोतून ही रक्कम नेली जात होती. ठाणे आणि नवी मुंबईतील निवडणुकीकरिता ही रक्कम आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटावरची लटकलेली चरबी सांगेल शरीरातली 'ही' कमजोरी

Maharashtra News Live Update: माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मोठी बातमी! छगन भुजबळ दिल्लीला जाणार? फडणवीस सरकारमध्ये 'या' नेत्याला मिळणार संधी? महत्त्वाची अपडेट समोर

Heart health warning signs: फक्त छातीत दुखणं नाही तर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Shocking : 'बाईSSS हा काय प्रकार!' स्पा करायला महिलेने डोळे बंद केले, सलून मालकाची नियत फिरली अन्...

SCROLL FOR NEXT