ajit pawar, baramati, police saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar In Baramati : पवारांच्या बालेकिल्ल्यात अजित दादांना काेणापासून धाेका?

पाेलिसांकडून अद्याप काेणतीच ठाेस माहिती मिळू शकली नाही.

मंगेश कचरे

Ajit Pawar Latest Marathi News : विरोधी पक्ष नेते अजित पवार आज (शनिवार) सकाळपासून बारामती शहरात आहे. बारामतीत पवार आल्यानंतर ते जनता दरबार करिता विद्या प्रतिष्ठान येथे पाेहचले. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी अजित पवार हे आग्रही असतात. त्यामुळेच आज हजारोच्या संख्येने नागरिक त्यांच्या अडीअडचणी सांगण्यासाठी विद्या प्रतिष्ठान येथे जमले हाेते. (Breaking Marathi News)

दरम्यान आज अचानक पवार यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आल्याचे दिसून आले. कुठल्याही व्यक्तीला पवार यांना भेटण्याकरिता थेट जाऊ दिले जात नव्हते. नागरिकाची सर्व तपासणी केली जात हाेती. विद्या प्रतिष्ठान इमारतीच्या बाहेर देखील पोलिसांचा (police) मोठा फाैजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सध्या (baramati) विद्या प्रतिष्ठान येथे बैठक सुरू आहे. हा पोलीस बंदोबस्त का वाढवला याचे कारण मात्र समजू शकले नाही. अजित पवार यांना काेणापासून धाेका आहे अशी चर्चा देखील झाली. दरम्यान माध्यमांनी पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांच्याकडून देखील अद्याप काेणतीच माहिती उपलब्ध हाेऊ शकलेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

SCROLL FOR NEXT