Cm uddhav Thackeray Convoy Saam Tv
मुंबई/पुणे

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अज्ञात कार; पोलिसांच्या तपासात 'ही' माहिती उघड

मलबार हिल पोलिसांनी त्या अनोळखी गाडी तपास सुरू केला. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ताफ्यात गाडी आडवी टाकणाऱ्या चालकाची मलबार हिल पोलिसांनी चौकशी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन परत येताना त्यांच्या ताफ्यात अनोळखी गाडी घुसल्याची घटना घडली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेवर (Security) प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर तातडीने मलबार हिल पोलिसांनी त्या अनोळखी गाडी तपास सुरू केला. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ताफ्यात गाडी आडवी टाकणाऱ्या चालकाची मलबार हिल पोलिसांनी चौकशी केली आहे. ( CM Uddhav Thackeray News In Marathi )

मुख्यमंत्र्यांना एवढी सुरक्षा असताना एक अनोळखी गाडी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली आणि त्यांना क्रॉस करून निघून गेली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसणाऱ्या वाहन चालकाची कसून चौकशी केली आहे. पोलिसांना चौकशीदरम्यान असे आढळून आले की, कार चालक गेल्या सात वर्षांपासून एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या मलबार हिल येथील रहिवासीसोबत काम करत आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. चालकाच्या म्हणण्यात त्यांना कोणताही हेतू आढळला नाही. तसेच चालकाचा दावा आहे की, त्याने वाहनांमध्ये अंतर पाहिल्यानंतर तो बंगल्यातून बाहेर आला आणि गाडी बाहेर काढली. त्याने सायरन ऐकले नाही. त्यामुळे तो थांबला नाही. तो म्हणाला की तो एक सन्माननीय नागरिक असल्याने त्यांच्या यात कोणताही हेतू नव्हता. मलबार हिल पोलिसांनी काल सायंकाळी वाहनाचीही तपासणी केली. दरम्यान, आज पुन्हा चालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात कोणताही हेतू दिसत नसल्याने गुन्हा दाखल केला जाणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT