Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad Cime News: सोशल मीडियावर PM नरेंद्र मोदी-अमित शहा यांची बदनामी; पिंपरी चिंचवडमधील तरुणाला अटक

Pimpri-Chinchwad Cime News: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय महिला मंत्र्यांचे व्हिडिओ-फोटो मॉर्फ त्यांची करून देशभरात बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri-Chinchwad Cime News: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय महिला मंत्र्यांचे व्हिडिओ-फोटो मॉर्फ त्यांची करून देशभरात बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका विकृत मानसिकतेच्या तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सायबर विभागाने अटक केली आहे. (latest Marathi News)

शमीम जावेद अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांचं नावं असून त्याला झारखंड राज्यातील रांची मधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी पिंपरी चिंचवड सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर तब्बल तीन महिने तपास करून सायबर पोलीस या तरुणापर्यंत पोहोचले आहेत.

मात्र आरोपीने तक्रार करणाऱ्या माजी खासदार अमर साबळे यांचे फेसबुक अकाउंटही हॅक केल अशी माहिती अमर साबळे यांनी दिली आहे. तर संबधित तरुणाला आज पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आल्या नंतर कोर्टाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. (Maharashtra Crime News)

हा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपीने देशातील अनेक राजकीय नेत्यांचे फोटो व्हिडिओ मॉर्फ केले असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. जर अशा पद्धतीने कुणी फोटो व्हिडिओ मॉर्फ करत असेल तर त्यांच्या विरोधातही सायबर ॲक्ट नुसार गुन्हे दाखल होऊ शकतात अशी माहिती सायबर सेलचे प्रमुख संजय तुंगार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

Maharashtra News Live Update:बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करणार

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे?

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! १० तोळा ७,७०० रुपयांनी वाढले; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर वाचा

SCROLL FOR NEXT