Pune Thief News Saam Tv News
मुंबई/पुणे

Women Thieves: नावात देवी पण काम दैत्याचं! दागिने लंपास करणाऱ्या लक्ष्मी अन् दुर्गा पोलिसांच्या जाळ्यात

Women Thieves in Pune: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत, दोन्ही चोरटे हातसफाई करायचे. मात्र, पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेत लंपास केलेला मुद्देमाल हस्तगत केलाय.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

गर्दीचा फायदा घेत प्रवाशांकडील सोन्या, चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी सापळा रचत चोरट्यांना अटक केलीय. दुर्गा उपाध्याय आणि लक्ष्मी सकट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत, दोन्ही चोरटे हातसफाई करायचे. मात्र, पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेत लंपास केलेला मुद्देमाल हस्तगत केलाय.

पुण्यातील स्वारगेट भागात एसटी स्टॅण्डसह पीएमपीएलची स्थानकं आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांकडील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारायचे. एखादी माहीला प्रवासीच्या अंगावर दागिने दिसले की २ महिला चोर, तसेच त्यांचे इतर साथीदार प्रवाशांच्या आजूबाजूला फिरत असे.

प्रवासी नेमकं कोणत्या बसमध्ये चढणार याची चोरटे आधी माहिती घेत असे. नंतर बसमध्ये चढताना चोरटे प्रवाशांच्या चारही बाजूनं घेराव घालायचे आणि हातसफाई करत दागिने लंपास करायचे. स्वारगेट पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून दागिने लंपास झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात येत होत्या. त्यामुळे स्वारगेट पोलिसांच्या दामिनी पथकानं या ठिकाणी गस्त घालण्यास सुरूवात केली.

पोलिसांना २ महिला संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता, दोन्ही आरोपी महिला मुळच्या कर्नाटकच्या असून, पुण्यात चोरी करण्यास येत असल्याची माहिती मिळाली. तसेच त्यांनी चोरीची देखील कबुली दिली असून, त्यांच्याकडून एकूण ४ लाख ८८ हजार रुपयांचे ६ तोळे दागिने जप्त करण्यात आलंय. त्यांनी आतापर्यंत स्वारगेट आणि कात्रज एस टी स्टँड भागात ५ गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैकिांनी फोडलं, पाहा VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्याला तोबा गर्दी, वरळी डोमबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

SCROLL FOR NEXT