Pune Crime News
Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: डॉक्टरी पेशाला काळीमा! डॉक्टरने रुग्ण महिलेला रुग्णालयात बोलावून केलं घृणास्पद कृत्य

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Pune Crime News: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका डॉक्टरने रुग्ण महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कात्रज भाागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात डॉक्टरने (Doctor) रुग्ण महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. अमित असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेने पुण्यातील कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी डॉ. अमितचे कात्रज भागात क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये पीडित महिला तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी या पीडित महिलेची डॉक्टरसोबत ओळख झाली. त्यानंतर या डॉक्टरने या पीडित महिलेकडे मोबाईल क्रमांक मागितला. त्यानंतर महिलेने तिचा मोबाईल क्रमांक डॉक्टरला दिला.

त्यांनंतर आरोपी डॉक्टरने महिलेला पुन्हा रुग्णालयात बोलावले. त्यावेळी आरोपी डॉक्टरने महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी आरोपी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तसेच भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

पुण्यात फुटपाथवर राहणाऱ्या भिकारी महिलेवर अत्याचार

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. खुन, मारामाऱ्या या घटनांनी पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले असतानाच एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर भिक्षा मागून उदरर्निवाह करणाऱ्या महिलेवर फूटपाथवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT