Crime News saam tv
मुंबई/पुणे

Crime : घृणास्पद! गर्भवती महिलेसमोर युवकाचे अश्लील चाळे; मुंब्र्यातील धक्कादायक प्रकार

गर्भवती महिला आपल्या घरी जात असताना तिचा पाठलाग करून तिच्यासमोर पँटची चैन खोलून प्रायव्हेट पार्ट बाहेर काढून अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

कल्पेश गोरडे

Thane Crime News : उल्हासनगर मध्ये एका अल्पवयीन तरुणांकडून वयोवृद्ध महिलेसोबत अश्लील चाळे केल्याची घटना ताजी असतानाच आता मुंब्रा येथे देखील असा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंब्रा येथील अमृतनगरात एक गर्भवती महिला आपल्या घरी जात असताना तिचा पाठलाग करून तिच्यासमोर पँटची चैन खोलून प्रायव्हेट पार्ट बाहेर काढून अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने मुंब्रा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा परिसरात मोहम्मद आकिब युसूफ कश्मिरी तरुणाने महिलेसमोर अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी १९ वर्षांचा असून हा प्रकारण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

आरोपीने महिलेला एकटी असल्याचे पाहून पाठलाग करत गाठले. त्यानंतर महिलेला 'चल मेरे साथ, में एक जगह पे लेके जात हूँ' असे बोलला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, या युवकाच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या तरुणाला सीसीटीव्हीच्या मदतीने १२ तासांच्या आत अटक केली आहे. उद्या या विकृत तरुणाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस (Police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृपाली बोरसे व धनंजय चव्हाण हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचे ६२६ रुग्ण

Weight Loss : वजन घटवायचं असेल तर रात्री 'या' ५ पदार्थांना करा बाय-बाय, आठवड्याभरात दिसेल फरक

BP Medicines: BP नॉर्मल आला म्हणून गोळी बंद केली? ठरू शकतं महागात; डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅकचा धोका वाढतो

Navratri 2026 : दुष्काळामुळे महाराष्ट्रात दांडिया रद्द? मराठी एकीकरण समितीची मागणी

Plane Crash: उड्डाण घेताच लष्कराचे विमान कोसळलं, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT