PMPL गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad : भर रस्त्यात लागली PMPL च्या बसला आग (पहा व्हिडीओ)

बसमधून जवळपास 70 प्रवासी प्रवास करत होते.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव (Pimple Guruv) येथील नदीपात्राच्या पुलावर पीएमपीएमएलच्या बसने अचानक पेट घेतला आहे. बसने ज्यावेळी पेट घेतला त्यावेळी या बसमध्ये जवळपास 70 प्रवासी प्रवास करत होते. (PMPL's bus caught fire)

पहा व्हिडीओ -

मात्र, बस चालकाच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. बसने पेट घेतल्यानंतर चालकाने लगेच बस थांबवली आणि सर्व प्रवासी खाली उतरले. मात्र, तोवर बसले मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. अखेर अग्निशमन विभाग (Fire department) वेळीच दाखल झाल्याने बसच्या आगीला आटोक्यात आणायला यश आलं.

बसमधून धुर निघत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने प्रवाशांना बाहेर पडायला सांगितले. सर्व प्रवाशी सुखरुप बाहेर पडल्याने अनर्थ टळला.पिंपळे गुरव बसस्थानक ते पिंपळे गुरव दापोडी पुल हे साधारण दोन ते तीन कि.मी.अंतर आहे.सकाळी 10.30 ते 11 दरम्यान ही घटना घडली. पिंपळे - गुरव वरून मार्केट यार्ड ला ही बस जात होती. त्या दरम्यान पिंपळे गुरव येथील नदी पात्र वरील पुलावर या बसण्याचा पेट घेतला आहे. पेट घेतलेली बस ही सीएनजी बस असून, या घटनेमुळे पीएमपीएमएलच्या बसेसच्या (PMPL Bus) सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT