Narendra Modi  saam tv
मुंबई/पुणे

Narendra Modi | पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्र्यांना मोठं आश्वासन, म्हणाले,'वेदांतापेक्षाही...'

महाराष्ट्राला 'वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प देतो', असे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uday Samant News : महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण 'वेदांता' ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज्यातील हा विषय केंद्रात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेतली आहे. 'महाराष्ट्राला वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प देतो', असे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

वेदांता प्रकल्पावरून मंत्री उदय सामंत यांनी प्रसारमााध्यमांशी संवाद साधला. उदय सामंत म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी मोदींशी फोनवरून संपर्क साधला. वेदांता प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांनी मोदींशी चर्चा केली. मोदींनी सांगितले की, मागच्या सात-आठ महिन्यांमध्ये वेदांता प्रकल्पाबाबत प्रतिसाद मिळाला नाही. तो प्रतिसाद उद्योजकाला पाहिजे होतो, तो मिळाला नाही. त्यामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे'.

'पंतप्रधान मोदींनी राज्यातील नागरिकांना आश्वास्त केले आहे की, वेदांता सारखा किंवा त्यापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देतो असं पंतप्रधानांनी मु्ख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. काही दिवसातचं हा प्रकल्प राज्याला बेरोजगारी दूर करण्यासाठी दिला जाईल असं आश्वासन मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे', अशी माहिती उदय सामंत यांनी सांगितली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना फोन करत वेदांताचा उद्योग प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करण्याची विनंती केली आहे. शिवाय महातष्ट्रातील परदेशी गुंतवणुकीबाबत सहकार्य करण्याची विनंती देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. त्यामुळे आता गुजरातला गेलेला प्रोजेक्ट राज्यात परतणार का मुख्यमंत्र्यांचा फोन काम करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT