PM Narendra Modi  Saam tv
मुंबई/पुणे

Narendra Modi: PM मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात येणार, कल्याण अन् दिंडोरीत जंगी सभा घेणार; मुंबईत करणार रोड शो

PM Narendra Modi Maharashtra Visit: पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात २० मे रोजी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरळीत पार पडलं. आता पाचव्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात २० मे रोजी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आज मोदी दिंडोरी आणि कल्याण येथे जाहीर सभा घेणार आहेत.

येथील जनतेला संबोधित केल्यानंतर मोदी उत्तर पूर्व मुंबई येथे एक रोड शो करणार आहेत. मोदींच्या सभेसाठी भाजप नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. पोलिसांनी देखील ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिलं आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी महाराष्ट्रात येऊन वादळी सभा घेत आहेत. आतापर्यंत चार टप्प्यातील प्रचाराला मोदींनी हजेरी लावून अनेक ठिकाणी वादळी सभा घेतल्या आहेत. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या (Lok Sabha Election) १३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील ६ मतदारसंघाचा समावेश आहे.

याशिवाय कल्याण, ठाणे, भिवंडी, नाशिक, दिंडोरी धुळे आणि पालघर या मतदारसंघातही मतदान होणार आहे. १८ मे रोजी या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होणार असल्याने राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, पंतप्रधान मोदी आज दुपारी दिंडोरी येथील एका सभेला संबोधित करतील.

त्यानंतर सायंकाळी मोदी कल्याण येथे जाहीर प्रचारसभा घेतील. कल्याणच्या सभेनंतर उत्तर पूर्व मुंबईत मोदी रोड शो देखील करणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी येथून पंतप्रधानांच्या रोड शोची सुरुवात होईल. त्यामुळे वाहतूकीत देखील मोठा बदल केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT