PM Narendra Modi saam tv
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्वाचं! PM मोदींच्या दौऱ्यासाठी मुंबईत अलर्ट, 'या' भागात ड्रोन, पतंग उडवण्यास बंदी

पंतप्रधानांचा हा दौरा जाहीर झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक...

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. येत्या १० फेब्रूवारीला पंतप्रधान मोदी मुंबई दौरा करणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा जाहीर झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

यासंबंधी मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढले आहे, ज्यामध्ये त्यांनी या दौऱ्याविषयीच्या सुचना दिल्या आहेत. (Mumbai)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात मुंंबई दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई एअरपोर्ट, आयएनएस शिक्रा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मरोळ आणि अंधेरी या भागात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.

या भागात अलर्ट...

ज्यामध्ये मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी, आयएनएस शिकारा यासह सहार विमानतळ पोलिस स्टेशन, कुलाबा पोलिस स्टेशन, माता रमाबाई मार्ग पोलिस स्टेशन आणि एमआयडीसी पोलिस स्टेशन या परिसरात पोलिसांनी 10 फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस ड्रोन, पतंग, छोटे विमान आणि फुग्यांवर बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी 144 अंतर्गत अलर्ट जारी केला आहे.

दहशतवादी किंवा असामाजिक घटकाचा ड्रोन किंवा अन्य छोट्या विमानाने हल्ला होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी ही बंदी घातली आहे. 10 फेब्रुवारी रोजी CST येथे PM मोदी दोन वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत.

वंदे भारत ट्रेनचे होणार उद्घाटन..

दरम्यान, मुंबईहून लवकरच 2 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. एक वंदे भारत ट्रेन मुंबई-सोलापूर मार्गावर तर दुसरी मुंबई-शिर्डी मार्गावर धावेल. 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Poha: वजन कमी कारायचं आहे आणि चटपटीत पण हवयं? मग सकाळी नाश्त्याला खा 'हे' हेल्दी पोहो

Fitness Withou Jym: जिमला वेळ नाही? फक्त 20 मिनिटांची ही सवय 30 दिवसांत बदलेल तुमचं शरीर

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा

Fact Check : ड्राय डेलाही दारू मिळणार? ड्राय डेबद्दल सरकारने निर्णय बदलला?

'अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले उत्तम मुख्यमंत्री'; विधीमंडळात दादांच्या आठवणींना उजाळा

SCROLL FOR NEXT