PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

PM Narendra Modi: PM नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर; शिंदे सरकार लागले कामाला

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात मुंबई महापालिकेच्या विविध कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सहित बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमदार यांची बैठक सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या या कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर विशेष लक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं असणार आहे.

मुंबई महापालिकेची तीन रुग्णालये, मलनिस्सारण प्लांट, सिमेंट क्राॅकिटचे रस्ते, पंतप्रधान स्वनिधी निधी योजना अशा विविध कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. १९ जानेवारी रोजी काही कामांचा शुभारंभही त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतल्याची चर्चा सुरु आहे.

मुंबई महापालिकेने कोणती कामे पूर्ण झाली आहेत?

मुंबई महापालिकेची आपली चिकित्सा योजने अंतर्गत भांडुप सुपर स्पेशालिटी, ओशिवरा प्रसुतीगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय यांच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ७ मलनिस्सारण प्लांट, मुंबईत होणारे ४०० किलोमीटरचे सिमेंट क्राॅकिटचे रस्त्याची कामे पूर्ण झाले आहेत. तसेच १ हजार ७५० कोटी रुपये खर्चून मुंबईचे सौंदर्यीकरण अशा विविध ५०० हुन अधिक काम पूर्ण झाले आहते. त्या कामाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच २६ हजार कोटींच्या मलनिस्सारण प्लांटचाही त्यात सामावेश आहे. त्याचबरोबर एक लाख फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधी निधी योजने अंतर्गत १० हजार रुपये कर्ज अशा एकूण १२ प्रकल्पाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहेत.

PM मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची बैठक सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सहित बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमदार यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला अनेक आमदार उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा व आगामी मुंबई महानगरपालिकेबाबत महत्वाची बैठक मानली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT