PM Narendra Modi pune visit Protest banner appeared in Pune city over manipur violence Saam TV
मुंबई/पुणे

PM Modi Pune Visit: मन की बात बंद करो, मणिपूर की बात करो; PM मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात झळकले बॅनर्स

PM Narendra Modi Pune Visit: मोदींच्या पुणे दौऱ्याआधीच विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. युवक काँग्रेसकडून पुणे शहरात पंतप्रधान मोदींचा निषेध करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

Dnyaneshwar Choutmal

PM Narendra Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच १ ऑगस्ट रोजी पुणै दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यात आल्यानंतर ते विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहे. मात्र, त्यांच्या पुणे दौऱ्याआधीच विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. युवक काँग्रेसकडून पुणे शहरात पंतप्रधान मोदींचा निषेध करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

"मन की बात बंद करो मणिपूर की बात करो", अशा आशयाचा मजकूर या बॅनर्सवर दिसून येत आहे. याशिवाय 'गो बँक क्राईम मिनिस्टर' असा मजकूर सुद्धा या बँनर्सवर दिसून येत आहे. मोदींच्या दौऱ्याआधीच युवक काँग्रेसने शहरात लावलेले हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहेत.

देशामध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मणिपूरच्या चर्चेवरुन या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ होत आहे. मणिपूर हिंसाचाराच्या या सगळ्या परिस्थितीवर विरोधक आक्रमक झाले असतानाच पंतप्रधान पुणे दौऱ्यावर येत आहेत.

पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुणे दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा महत्त्वाचा असण्याचे कारण म्हणजे पुरस्कार समारंभाच्या या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फूटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार प्रथमच एका मंचावर दिसतील. शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूड अभिनेत्रीचा कारनामा! निर्मात्याला डांबून ठेवलं, बंदुकीचा धाक दाखवून १० लाख रूपये उकळले, सिनेसृष्टीत खळबळ

Maharashtra Live News Update: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय! १०० कोटींची इमारत खरेदी करणार

Nashik Tourism: हिरवागार निसर्ग आणि थंडगार वारा! नाशिकवरुन फक्त २५ किलोमीटरवर असलेल्या 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

Blood Moon 2025: आज भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ब्लड मूनची अद्भुत दृश्यं पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT