PM Modi Mumbai Visit Twitter/ ANI
मुंबई/पुणे

PM Modi Mumbai Visit: मुंबईकरांसाठी सुचना! ड्रोनसुद्धा उडू शकत नाही, वाहतुकीतही बदल; PM मोदींच्या सुरक्षेसाठी मुंबईत अलर्ट

पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी मुंबईमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी पोलिसांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे.

Gangappa Pujari

Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे.

पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी मुंबईमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या एकदिवसीय दौऱ्यामुळे आर्थिक राजधानी मुंबईतील अनेक भागात वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. यादरम्यान ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि अनेक योजनांची पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) या भेटीबाबत, मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट केले की, "१९ जानेवारी रोजी दक्षिणेकडील रस्त्यावर सायंकाळी ४.१५ ते ५.३० या वेळेत, तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर संध्याकाळी ५.३० ते ६.४५ या वेळेत वाहतूक मंद होऊ शकते. उत्तरेकडील वाहतूकीवर परिणाम होऊ शकतो."

ड्रोनसह विविध उड्डाणांवर बंदी..

पंतप्रधान मोदींच्या गुरुवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्व प्रकारच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये ड्रोन, पॅराग्लायडर्स आणि रिमोटली ऑपरेटेड लाईट एअरक्राफ्टचा समावेश आहे. वृत्तानुसार, BKC, अंधेरी, मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी 12 ते मध्यरात्री 12 पर्यंत ही बंदी करण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात मुंबई मेट्रोला (Mumbai Metro) नवी गती मिळणार आहे. यादरम्यान मोदी मुंबई मेट्रो लाइन 2A आणि लाइन 7 चे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींच्या प्रस्तावित दौऱ्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT