pimpri news  Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad : पापा की परी की 'छपरी'? पिंपरीमध्ये रस्त्यावर तरुणींचा दगडाने हाणामारी करत राडा, Video Viral

पिंपरी-चिंचवड शहरात एका महाविद्यालयातील विद्यार्थिनींची हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri News : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हाणामारीच्या घटना अनेकांनी पाहिल्या असतील. मात्र, आता हाणामारी करण्यात विद्यार्थिनी देखील मागे राहिल्या नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरात एका महाविद्यालयातील विद्यार्थिनींची हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या विद्यार्थिनींनी चक्क दगडाने मारहाण केली आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा भांडणाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील एका महाविद्यालयाजवळ हा प्रकार घडल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही मुली विद्यार्थिनी एका मुलीला मारहाण करताना दिसत आहे. या विद्यार्थिनी शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी एका तरुणीला मारत आहेत.

यावेळी विद्यार्थिनीने एका मुलीला दगड देखील फेकून मारल्याचे व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसले. दोन-तीन दिवसांपूर्वी देखील या विद्यार्थिनींच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल होता. त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे.

नव्याने व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन-तीन मुली घोळक्याने एका विद्यार्थिनीला मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, मारहाण झालेल्या विद्यार्थिनीच्या बहिणीने दुसऱ्या मुलीला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी दगडाने मारहाण करून तुडवलं आहे. या घटनेचे व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले आहेत. मात्र, मारहाण करणाऱ्या या विद्यार्थिनींवर कॉलेज प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी या महाविद्यालयाच्या ड्रेसवर आहे. तर काही साध्या ड्रेसवर आहे. महाविद्यालयाच्या ड्रेसवर असून या विद्यार्थिनी हाणामारी करताना दिसत आहे. विद्यार्थिनींची हाणामारी सुरू झाल्यावर रस्त्यावरील इतर काही महिला सोडवण्यास आल्या.मात्र,त्यांनाही या विद्यार्थिनी ऐकत नव्हत्या. तर रस्त्यावरील काही माणसं विद्यार्थिनींचे हाणामारीचा व्हिडिओ कॅमेरात कैद करण्यात व्यग्र होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT