pimpri chinchwad, police, arrests saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News : लैंगिक अत्याचाराची तक्रार.. मुलीचा खून, दाेघांना अटक

घटनास्थळी एखादा सुरक्षा रक्षक असता तर कदाचित आज एक जीव वाचला असता.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad Crime News : लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा दोघांनी मिळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. या घटनेतील संशयित दाेन्ही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Breaking Marathi News)

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आणि महापालिकेतर्फे उभारल्या गेलेल्या रिकाम्या इमारतीमध्ये अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत मृत पावलेली मुलगी मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होती. पीडित मुलीचा मृतदेह मिळाल्या नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तिचा खून करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन संशयित आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती काकासाहेब डोळे (पोलिस उपायुक्त, पिंपरी चिंचवड झोन टू) यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा खून केल्या नंतर दोन्ही संशयित आरोपी मोकाट फिरत होते. मात्र पोलिस त्यांच्यापर्यंत पोचले आणि दोघांच्याही मुसक्या आवळल्या.

दरम्यान चौकशी दरम्यान पोलिसांनी संशयितांना खून करण्याचे कारण विचारलं तेव्हा संशयितांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीसही हादरले. या घटनेतील दुसरी एक धक्कादायक बाब म्हणेजे ज्या ठिकाणी पीडित मुलीचा खून करण्यात आला. ती इमारत मागील दीड दाेन वर्षांपासून ओस पडली आहे. इथे एखादा सुरक्षा रक्षक असता तर कदाचित आज एक जीव वाचला असता.

आता घटना घडल्या नंतर पोलिसांनी संबधित विभागावर कारवाई करणार असल्याचं सांगत आहेत. मात्र पोलिसांना हे शहाणपण आधीच सुचलं असतं तर आज एका मुलीचा नाहक बळी गेला नसता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT