Crime News Saam tv
मुंबई/पुणे

युवतीचा विवस्त्र व्हिडिओ व्हायरल; पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यावर गुन्हा

संबंधित युवकास लवकरात लवकर ताब्यात घेतले जाईल अशी माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील टाेणपे यांनी दिली.

गोपाल मोटघरे

पिंपरी : मैत्रीच्या काळात मैत्रीणिने पाठविलेला स्वतःचा विवस्त्र असलेला व्हिडिओ मित्राने व्हायरल केल्याने संबंधित युवतीने सांगवी पाेलिसांत तक्रार दाखल केली. त्यानूसार सांगवी (जि. पुणे) (pune) पाेलिसांनी एका युवकावर (youth)) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. pimpri chinchwad pune latest crime news

याबाबतची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील टाेणपे यांनी दिली. ते म्हणाले एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. आरोपी आणि पीडित दोघे पुण्यातील आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते लग्न करणार होते. त्यांच्यात काही कारणास्तव ब्रेकअप झाले. दरम्यान प्रियकराने आपल्या प्रेयसीचा त्याच्याकडे असलेला तिचा विवस्त्र व्हिडिओ अन्य काही जणांना पाठविल्याची तक्रार संबंधित पिडीतीने दिली आहे.

विनयभंगचा गुन्हा दाखल

त्यानूसार सांगवी पाेलिस ठाण्यात कलम ३४५ (विनयभंग) अंतगर्त तसेच विविध कलमानूसार युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुनील तांबे हे करीत आहेत. संबंधित युवकास लवकरात लवकर ताब्यात घेतले जाईल अशी माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील टाेणपे यांनी दिली.

युवा पिढीने असं वागू नये

भावी वधू-वर असाे अथवा मैत्री असाे युवा पिढीने अशा चुकीच्या पद्धतीची मागणी ज्यांनी केले असेल ती पुर्ण करु नये. जेणे करुन ब्रेकअप झाल्यावर तुमची अशा पद्धतीचे छायाचित्रण इतरांना पाठवून बदनामी हाेणार नाही. तसेच संबंधितांवर कायदेशिर कारवाईची वेळ येणार नाही असे आवाहन वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील टाेणपे यांनी केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

SCROLL FOR NEXT