Pimpri Chinchwad News Saam Digital
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News : आयटी सीटी हिंजवडीत सुरू होता भलताच प्रकार; पिंपरी चिंचवडचे पोलीसही चक्रावले

Pimpri Chinchwad Crime News : आयटी सीटी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या पथकाने धाड टाकून देहविक्री करणाऱ्या तीन पीडित मुलींची सुटका केली आहे.

Sandeep Gawade

आयटी सीटी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या पथकाने धाड टाकून देहविक्री करणाऱ्या तीन पीडित मुलींची सुटका केली आहे. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील डिंनस रसिडेन्सी सोसायटीमधील फ्लॅट नंबर 302 मध्ये देहविक्री सुरू होती. त्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सूर्यकांत पंडित देवरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सूर्यकांत पंडित देवरे हा दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी डिंनस सोसायटीतील फ्लॅटमध्ये काही मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावत होता. याची गोपनीय माहिती मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला प्राप्त झाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या तीन पीडित मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणातील आरोपी सूर्यकांत पंडित देवरे या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरोधात भा द वी 307, (3) सह देहविक्री प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3,4,5 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार? सरकार उद्योग अन् रोजगारावर भर देणार?

India vs New Zealand T20: भारताचा टी२० मालिकेत धमाकेदार विजय, इशान आणि अर्शदीप ठरले स्टार, न्यूझीलंडला ४-१ने लोळवलं

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT