Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Crime News: भंगार खरेदीवरून किरकोळ वाद, जंगलात नेलं अन्...; पिंपरी-चिंचवडमधील थरारक घटना

Pimpri Chinchwad Crime News: भंगार व्यावसायिकाची डोक्यात लोखंडी हातोडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad Crime News :

गेल्या काही दिवसांपासून पुणे,पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात भंगार खरेदीच्या किरकोळवादातून एका भंगार व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. या भंगार व्यावसायिकाची डोक्यात लोखंडी हातोडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये एक भंगार व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. सिराज अब्दुल हसन खान असं भंगार व्यवसायिकाचं नाव आहे.

सिराज अब्दुल हसन खान यांच्या हत्या प्रकरणात चिखली पोलिसांनी सैफुद्दीन खान आणि मोहम्मद अनिस या दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पिंपरी-चिंचवडमध्ये काही महिन्यापूर्वी भंगार खरेदीच्या किरकोळ वादातून सिराज अब्दुल हसन आणि सैफुद्दीन खान यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या किरकोळ वादामुळे सैफउद्दीन खान याला सिराज अब्दुल हसनपासून जिवाला धोका उदभवू शकतो असं जाणवत होतं.

सैफउद्दीन खान याने सिराज अब्दुल हसनला भंगार खरेदी करण्याचं कारण सांगून आपल्या दुचाकीवर बसवून नेलं होतं. त्यानंतर चहरोली परिसरातील जंगलात मित्राच्या मदतीने सिराजने अब्दुलच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार केला. या हल्ल्यात अब्दुलचा मृत्यू झाला आहे. असं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Director Death : हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT