Pimpri Chinchwad Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune : गटारीची पार्टी ठरली काळरात्र; किरकोळ वादातून तरुणाला संपवलं, १० जणांना अटक

Pimpri Chinchwad Crime News : तरुणांच्या ग्रुपमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून नऊ जणांच्या टोळक्याने एकाच्या पोटावर चाकूने वार करून खून केला आणि अन्य दोघांवर जीवघेणा हल्ला केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी चिंचवड: काल, गुरुवारी राज्यभरात गटारी अमावस्या साजरी करण्यात आली. गटारी साजरी करण्यासाठी मित्रांसोबत पार्टी (Gatari Party) करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. नदीच्या किनारी, मोकळ्या मैदानात आणि थंड हवेत गटारीची पार्टी सुरू होती. पार्टी ऐन रंगात असताना तरुणांमध्ये आपापसात वाद झाला आणि या वादात होत्याचं नव्हतं झालं. तरुणांच्या ग्रुपमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून नऊ जणांच्या टोळक्याने एकाच्या पोटावर चाकूने वार करून खून (Murder) केला आणि अन्य दोघांवर जीवघेणा हल्ला केला. यापैकी एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) रात्री साडे सातच्या सुमारास वाकड गावठाण येथे घडली होती. (Pimpri Chinchwad Crime News)

हे देखील पाहा -

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील मुळा नदी काठी मोकळ्या मैदानात मयत दीपक व अल्पवयीन आरोपी हे दोन वेगवेगळया ग्रुपमध्ये गटारी साजरी करण्यासाठी बसले होते. दुपारी दीपक याने अल्पवयीन आरोपीला तू माझ्या मित्राचा लहान भाऊ आहेस तू गुटखा, दारू व अन्य व्यसने करू नको असे म्हणत त्याच्या कानाखाली मारली. त्याने ही बाब अन्य मित्रांना सांगितली तेव्हा हे सर्वजण तिथून जाऊन सातच्या सुमारास वाकड गावठाण येथे थांबले. काही वेळाने दीपक येताच त्याच्यावर सर्वांनी हल्ला चढविला, सुरुवातीला त्याला दगड विटाने मारहाण झाली नंतर एकाने गाडीतील चाकु काढून दीपकच्या पोटावर वार केले. तर लखन याच्या डोके, हात आणि पोटावर वार करण्यात आले. याबाबत पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार खंडू उर्फ दीपक गायकवाड (वय. १९, रा. म्हातोबा नगर, वाकड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून लखन अंकुश लगस (वय. २२, रा. म्हातोबा नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आदित्य थोरात (वय. १९, रा. पॉलरीस हॉस्पिटल जवळ वाकड) हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी सुमित सावंत (वय. २१, रा. सायकर चाळ, वाकड), अमोल देशमुख (वय २४, रा. शेडगे वस्ती, वाकड), अभिषेक उर्फ नंदू कांबळे (वय. २०), सुजित लोंढे (वय. १८, दोघेही राहणार वाकड गावठाण), आशिष भिसे उर्फ मर्फी (वय. वाकड चौक), ब्रम्हा जाधव (वय. २०), महेश जाधव (वय. २४, रा. दोघेही वाघमारे कॉलनी, दत्त मंदिर रोड, वाकड), सौरभ जाधव (वय. १८, रा. सुतारवाडी, पाषाण) यांच्यासह एका १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT