OBC leader Mangesh Sasane alleges death threats after exposing fake caste certificate fraud in Pimpri-Chinchwad municipal politics. saam tv
मुंबई/पुणे

आरक्षणाला आव्हान, हत्येची धमकी, पिपंरी-चिंचवडमधील नगरसेवकांकडून धमकी?

Pimpri-Chinchwad Politics राजकारणी सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचं एक उदाहरण समोर आलंय. महापालिकेत 'बोगस' कुणबी प्रमाणपत्रं सादर करून नगरसेवकपद मिळवणाऱ्यांचा भांडाफोड करण्य़ात आलाय. म्हणूनच की काय आता थेट ओबीसी नेत्यालाच संपवण्याचा डाव रचला जातोय?. काय आहे नेमकं प्रकरण? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

ही ऑडिओ क्लिप नीट ऐका... याच ऑडिओ क्लिपमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील काही नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांवर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी गंभीर आरोप केले होते. आता याच मंगेश ससाणेंना अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिलीये. बोगस प्रमाणपत्रांबाबत नेमके काय आरोप आहेत ते पाहूयात...

पिपंरी चिंचवड महापालिकेतील 25 पेक्षा जास्त नगरसेवकांनी बोगस ओबीसी दाखला जोडल्याची ससाणेंनी तक्रार केलीय. मराठा समाजातील उमेदवारांनी बनावट कुणबी प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली आणि विजय मिळवल्याचा त्यांचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर रवी लांडगे यांच्यासह अनेक नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. आणि य़ामुळेच आपल्याला या नगरसेवकांकडून धमकी येत असल्याचा दावा ससाणेंनी केलाय़.

बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलीये. या प्रमाणपत्रांसह जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांचीही सखोल करून कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT