Crime News AI Photo
मुंबई/पुणे

Pune Crime: नोकरी जाण्याची भिती, आचाऱ्याने दुसर्‍या आचाऱ्याचा चाकूने गळा कापला, पुण्यात भरदिवसा हत्या

Chef Kills Co-Worker Over Job Insecurity: बार मालक आपल्याला कामावरून काढून तर टाकणार नाही ना, या भीतीने एका आचाऱ्यानं दुसऱ्या सहकर्मचारी असणाऱ्या आचाऱ्याची गळा कापून हत्या केली.

Bhagyashree Kamble

बारमधील एका आचाऱ्यानं सहकर्मचारी असलेल्या आचाऱ्याचा धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील म्हाळुंगे पोलिस स्टेशन हद्दीतील हॉटेल ऐश्वर्या गार्डन अँड बारमध्ये घडली आहे. दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच वादावादीमध्ये आचाऱ्यानं सहकर्मचारी असलेल्या आचाऱ्याचा चाकूने गळा चिरला. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उदयगिरी उर्फ सुनिल गिरी (वय वर्ष ३५) असे आरोपीचे नाव आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल ऐश्वर्या गार्डन अँड बार येथे स्वयंपाकीचं काम करीत आहे. आरोपी उत्तर प्रदेशमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणी बार मालकाने विजय विनायक पांचाळ (वय वर्ष ३५) या आचाऱ्याला कामावर ठेवले होतं.

बार मालक आपल्याला कामावरून काढून तर टाकणार नाही ना, या भीतीने सुनील उर्फ उदय गिरी याने विजय पांचाळ याच्याशी वाद घातला. उदयगिरी या आरोपीचा राग अनावर झाला. त्यानं चाकू घेतला आणि थेट विजयवर सपासप वार केले. तसेच गळ्यावरही चाकूने वार केले.

या हल्ल्यात विजय पाचांळे गंभीर जखमी झाले. रूग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT