Pimpri Chinchwad Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात, रस्ता ओलांडणाऱ्या पती-पत्नीला ट्रकने उडवलं, एकाचा जागीच मृत्यू

Pimpri Chinchwad Accident News : पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पती-पत्नीला जोरदार धडक दिली.

Satish Daud

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पुणे पोर्श कार आणि मुंबईतल्या वरळी येथील हिट अँड रनची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्येही रविवारी मध्यरात्री अशाच प्रकारची घटना घडली. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पती-पत्नीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दाम्पत्य १० ते १२ फूट हवेत उडाले.

या घटनेत ४२ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शरद वसंत गायकवाड (वय ४२) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. अपघातानंतर (Accident News) घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद वसंत गायकवाड हे रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या पत्नीसोबत पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील शनि मंदिराकडून डिकेथलॉन मॉलकडे जात होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना समोरून भरधाव ट्रक आलाय. काही क्षणातच या ट्रकने पती-पत्नीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की ट्रकची धडक बसताच पती-पत्नी हवेत उडाले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शरद यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले.

शरद यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यांच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघात झाल्यानंतर वाकड पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. औंध येथील जिल्हा रुग्णालयात ड्रायव्हरला ड्रंक अँड ड्राईव्हच्या वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं होतं. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT