Pimpari Chinchwad Crime News: पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिचवड शहरात निर्जन रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन काही चोर दुचाकीवर धूम स्टाईलने येऊन पळवत होते. या चोरांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Crime News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad News) निर्जन रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन काही चोर दुचाकीवर धुम स्टाईलने येऊन पळवत होते. या चोरांना पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा दोन पोलिस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
या चोरट्यांकडून 6 अँड्रॉइड मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा 1 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. राज उर्फ नन्या आनंद लष्करे, केशव उर्फ ओम किशोर आलंकार आणि एका विधी संघर्ष बाल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, या तिन्ही गुन्हेगारांकडून पोलिसांनी चिखली (Chikhali) आणि दिघी पोलीस (Dighi Police) स्टेशनमधील तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या मोठया कारवाईने पिंपरी चिंचवड शहर परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.