लैंगिक अत्याचार! Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Physically assaulted woman Case : पुण्यामध्ये सलग चौथ्या दिवशी महिलेवर लैंगिक अत्याचार झालाय. या घटनेमुळे शहरात संतापाचं वातावरण आहे.

Rohini Gudaghe

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

पुण्यात सलग चौथ्या दिवशी महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलंय. पन्नास वर्षीय नराधमाने छत्तीस वर्षे महिलेवर घरात घुसून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

वारजे माळवाडी परिसरामध्ये एका सोसायटीतील ३६ वर्षे महिला आपल्या घरात भांडी घासत (Physically assaulted woman Case) होती. त्यावेळी पन्नास वर्षीय आरोपीने घरात घुसून आई कुठे आहे? आई कुठे आहे? असा आवाज देत पीडित महिलेला खाली पाडत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या या कृत्यामुळे पीडित महिला अत्यंत घाबरली होती. घाबरलेल्या पिडीतेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका घेतली.

वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा

आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर पिडीत महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ (Pune Crime News) झालीय. आज सलग चौथ्या दिवशी महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलीय. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहरातील धक्कादायक घटना

बोपदेव घाटात तरूणीवर सामूहिक अत्याचार, तर वानवडी येथे शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार (Crime News), कोंढवा परिसरात एका चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार अशा घटना मागील काही दिवसांत (Pune News) घडलेल्या आहेत. या संतापजनक घटनांचे तीव्र पडसाद पुण्यात उमटताना दिसत आहेत. या घटनांमुळे महिला आणि मुलींमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT