Shivraj Singh Chauhan and Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

OBC Reservation: उद्धव ठाकरे आणि CM शिवराजसिंह चौहान यांच्यात फोनवरून चर्चा

OBC आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ नये अशी आमची भूमिका - मंत्री जयंत पाटील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यात OBC आरक्षणा संदर्भात फोनवरून १० मिनिट चर्चा झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ओबीसी आरक्षण संदर्भात ही चर्चा झाली.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर आज राज्य मंत्री मंडळाची बैठक झाली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ नये अशी आमची भूमिका असल्याची माहीती मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. शिवाय मध्य प्रदेशमधील आरक्षण गेल्यावर हा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाला असून महाराष्ट्र सरकारमूळे ओबीसी आरक्षण गेल्याची विरोधकांची ओरड चुकीची होती. हे समोर आलं असल्याचंही पाटील म्हणाले. तसंच सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे प्रोसिजर सुरू झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, ओबीसी आरक्षणा शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य निवडणुक आयोग व राज्य सरकारला आदेश दिले आहेत. याच OBC आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्यांमध्ये फोनवरून १० मिनिट चर्चा झाली असून OBC आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य सरकार पुर्नविचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं देखील माहिती समोर येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोन्याचे दर ₹८५००० पर्यंत घसरणार? आता खरेदी करावं की नाही

Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल

International Film Festival: मराठी अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलबाला, 'द मशरूमस' साठी मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

LPG Cylinder: LPG च्या नियमात मोठा बदल, फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर; सर्वसामान्यांना दिलासा

Maharashtra News Live Update: रूपाली चाकणकर सुनेत्रा पवारांच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज भरायच्या कार्यक्रमात अनुपस्थित

SCROLL FOR NEXT