Petrol Diesel  Saam Tv News
मुंबई/पुणे

पेट्रोल पंप चालकांचे ३१ मे रोजी आंदोलन; पंप चालू असणार का?

इंधनाच्या दारात अचानक होणारी वाढ आणि घट, यामुळे पेट्रोल पंप चालकांना नुकसान सहन करावे लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यातील पेट्रोल (Petrol) पंप चालक ३१ मे रोजी आंदोलन करणार आहेत. एक दिवस इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधन विक्री सुरू राहणार असून ग्राहकांना अडचण होणार नसल्याची माहिती पेट्रोल चालकांनी दिली.

इंधनाच्या दारात अचानक होणारी वाढ आणि घट, यामुळे पेट्रोल पंप चालकांना नुकसान सहन करावे लागत असल्याचं पेट्रोल (Petrol) पंप चालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे एक दिवस इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल पंपव चालकांनी घेताला आहे.

पेट्रोल, डिझेलमध्ये (Diesel) अचानक वाढ, आणि कमी केल्यामुळे पेट्रोल पंप चालकांना नुकसानीला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने अचानक पेट्रोलचे दर ९ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी केले, त्यामुळे मोठ्या तोट्याला पेट्रोल पंप चालकांना सोमोरे जावे लागले आहे.

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? टाकी फुल्ल करण्यापूर्वी एकदा दर तपासा

देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, 21 मे रोजी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ही कपात झाली आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला.

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. कंपन्यांनी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या आठवड्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आजचे नवीन दर जाणून घ्या

- दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

- मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल रु. 97.28 रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लीटर

- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

- तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.58 रुपये प्रति लिटर

- पटनामध्ये पेट्रोल107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

- गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 109.62 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police : प्रमोशन रखडले, निवृत्ती जवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची फरफट; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Needle-free injection Nagpur: सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! नागपुरात मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

SCROLL FOR NEXT