Avinash Bhosale Saam Tv
मुंबई/पुणे

अविनाश भोसलेंची मुंबई उच्च न्यायालयात याचिका; अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

सीबीआयकडून करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसले यांनी अँड. विजय अग्रवाल यांच्यामार्फत ही रीट याचिका दाखल केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - सीबीआयमार्फत करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील (Pune) प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले सध्या सीबीआयच्या (CBI) अटकेत आहेत.

सीबीआयकडून करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसले यांनी अँड. विजय अग्रवाल यांच्यामार्फत ही रीट याचिका दाखल केली आहे. भोसलेंना झालेली अटक ही चुकीची आणि वैधानिक तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यावर सीबीआयच्यावतीनं उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने पुढील सुनावणी 23 जून रोजी निश्चित केली आहे.

हे देखील पाहा -

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना येस बँक, डीएचएफएल प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. भोसले हे महाराष्ट्रातील काही आघाडीच्या राजकारण्यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात सीबीआयने छापेमारी केली होती, त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

"सीबीआय' ने गेल्या वर्षी भोसले यांच्या मुंबई व पुण्यातील "एबीआयएल' कंपनी, घरामध्येही छापे टाकले होते. भोसले व त्यांच्या कुटुंबाच्या ४०. ३४ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची प्रशस्त कार्यालये आहेत. तर पाषाणमध्ये येथे भोसले यांचे आलिशान निवासस्थान आहे. भोसले यांना यापूर्वीही विदेशातून कर चुकवून मौल्यवान वस्तू घेऊन येताना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गुरुवारी सायंकाळी भोसले यांना त्यांच्या घरातून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT