Shikhar Bank Scam Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळ्याची SIT चौकशी करा, मुंबई हायकोर्टात याचिका; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

Shikhar Bank Scam Case News: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

Satish Daud

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शिखर बँक घोटाळा (Shikhar Bank scam case) प्रकरणी नुकताच मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेनं विशेष न्यायाधीशांकडे क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. शिखर बँकेत कोणतेही चुकीचे झालेले नाही. त्यातून बँकेचं कोणतेही नुकसान झालं नाही, असं आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला होता. या प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली होती. शिखर बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

यामध्ये अजित पवार यांच्यासह ७० जणांचे प्राथमिक आरोपपत्रात नाव होते. बँकेने साखर कारखान्यांना कर्जवाटप करताना बँकिंगसह आरबीआयच्या (RBI) नियमांचे उल्लंघन केलं. तसेच कमी व्याजदरात कर्जवाटप करून मालमत्ता कवडीमोल दरात विकली, असा उल्लेख आरपपत्रात करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१९ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ईडीने क्लीन चीट दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने देखील अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांना दिलासा दिला होता.

मात्र, आता या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार असून न्यायालय एसआयटी चौकशीचे आदेश देते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT