देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस - Saam Tv
मुंबई/पुणे

#कलमहाराष्ट्राचा - देवेंद्रजी जरा सावधान!

साम टिव्ही

मुंबई : महाराष्ट्रातील Maharashtra जनतेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांना मोठा इशारा साम सकाळच्या सर्वेक्षणातून दिला आहे. त्यांच्या कामाबद्दल थेट असमाधान असणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २८.१ टक्के आहे आणि अपेक्षेपेक्षा कमी काम होत असल्याचे १७.७ टक्के मतदान सांगते आहे. (percecption about devendra Fadanavis in sakal saam Survey)

जुलैमधील विधीमंडळ अधिवेशनात भाजपच्या आमदारांना निलंबित केले गेले. ते अधिवेशन भाजपने विधीमंडळाबाहेर घालवले. त्यानंतर भाजपला सूर गवसलेला नाही आणि फडणवीस यांनाही. हे या सर्व्हेक्षणाचा कौल अधोरेखीत करते.

गेल्या सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या काळात ते आक्रमक होते. नंतर विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांची आक्रमक ही प्रतिमा कायम राहिली. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्या सारखे नेते फडणवीस यांच्याबद्दल कायमच नाराज राहिले. खडसे यांनी तर फडणवीसांवर उघड आरोप केले होते. नंतर खडसे पक्षाबाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. (percecption about devendra Fadanavis as maharashtra CM in sakal saam Survey)

भाजपच्या मतदारांमधील देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचे पर्स्पेशन:

(भाजपच्या मतदारांमधील कल)

आज निवडणूका झाल्यास भाजपला मतदान करू, असे सांगणारे : ९,३०३

त्यापैकी...

देवेंद्र यांची कामगिरी निराशाजनक वाटणारेः ३२९

अपेक्षेहून कमी वाटणारेः ५८५

1. निराशाजनक असतानाही देवेंद्र मुख्यमंत्री हवेतः ९६

2. अपेक्षेहून कमी असतानाही देवेंद्र मुख्यमंत्री हवेतः २३७

3. अपेक्षेहून कमी; निराशजनक असताना पंकजा मुंडे मुख्यमंत्री हव्यातः १६९

4. अपेक्षेहून कमी; निराशजनक असताना इतर कोणी मुख्यमंत्री हवेः २४१

त्यापैकी, देवेंद्र यांची कामगिरी उत्कृष्ट, समाधानकारक वाटणारेः ७१००

1. उत्कृष्ट, समाधानकारक असल्याने देवेंद्र मुख्यमंत्री हवेतः ५८६५

2. उत्कृष्ट, समाधानकारक असतानाही पंकजा मुंडे मुख्यमंत्री हव्यातः ५१३

3. उत्कृष्ट, समाधानकारक असतानाही इतर मुख्यमंत्री हवेतः ३८७

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arshad Khan: हार्दिक पंड्याला आणखी एक पर्यायी ऑलराउंडर सापडला? कोण आहे अरशद खान?

Today's Marathi News Live : शरद पवार नाशिकला पोहोचले, हेलीकॉप्टरने आगमन

IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

Weight Loss Tips: खाण्यापिण्याच्या 'या' सवयी पाळा, आठवडाभरात वजन होईल कमी

Char Dham Yatra 2024: चारधामला जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॉफिक जाम; ६ भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT