नागरिकांनी तारतम्य ठेवून वागावं, अन्यथा कठोर निर्णय घेणार; अजित पवारांचा इशारा Saam TV
मुंबई/पुणे

नागरिकांनी तारतम्य ठेवून वागावं, अन्यथा कठोर निर्णय घेणार; अजित पवारांचा इशारा

'कोरोना पुन्हा एकदा खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे काही नवीन नियम करण्यात आले आहेत नागरिकांनी तारतम्य ठेवून वागावे अन्यथा परिस्थिती बिघडली तर कठोर लॉकडाऊन सारखा निर्णय घ्यावा लागेल'

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : कोरेगाव भिमा (Koregaon Bhima) विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आज पहाटेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आले होते. त्यांनी विजयी स्तंभाला अभिवादन केलं, आणि माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'मी कोरेगाव भीमाच्या शुरांना अभिवादन करतो इथला इतिहास स्मरणात राहील असा आहे. कोरेगाव भिमा येथील विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्यांचही त्यांनी यावेळी सांगितलं.

हे देखील पहा -

कोरोना वेगाने पसरत आहे -

दरम्यान कोरोना Corona पुन्हा एकदा खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे काही नवीन नियम करण्यात आले आहेत नागरिकांनी तारतम्य ठेवून वागावे अन्यथा परिस्थिती बिघडली तर कठोर लॉकडाऊन (Lockdown) सारखा निर्णय घ्यावा लागेल, काल मुख्यमंत्र्यांनी तीन तास टास्क फोर्ससोबत बैठक केली असल्याचही त्यांनी सांगितलं. काळजी घ्या, स्थिती फार वेगाने खराब होत आहे. राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार कोरोना बाधित आहेत. सगळ्यांनाच नियम पाळावे लागतात असही पवार यावेळी म्हणाले.

मुंबई पुण्याची स्थिती तीन दिवसात वेगाने बिघडली आहे. शर्यती सार्वजनिक कार्यक्रम करू नका, गर्दी करू नका, मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत राज्यात सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी करा सांगतच आपला या नवीन वर्षाचा संकल्प हे राज्य कोरोना मुक्त करण्याचा असल्याचही अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT