Pune Hotel Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Video: पुण्यात उडता पंजाब! नामांकित हॉटेलमध्ये अल्पवयीन तरुणांची ड्रग्ज पार्टी; पाहा व्हिडिओ

Pune Hotel Viral Video: पुण्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथील एका एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये सर्रासपणे ड्रग्ज पार्टी होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

पुण्यातल्या हॉटेल्समध्ये सर्रासपणे ड्रग्ज पार्टी होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. पुण्यातल्या एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय. या व्हिडीओत काही तरूण लेट नाईट पार्टीनंतर बाथरूममध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचं समोर आलंय.

या व्हिडीओनंतर पुण्यातल्या हॉटेल्सबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. हा व्हिडीओ नेमका कुठल्या हॉटेलमधला आहे. ड्रग्जसेवन करणारे हे तरूण कोण आहेत? पुण्यात नेमकं काय सुरू आहे? याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.

याआधीच पुण्यात एक भीषण दुर्घटना घडली होती. अलीकडेच पुण्यात पुणे पोर्शे कार एका अल्पवयीन तरुणाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवत दोन जणांना उडवलं होतं. यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतर अनेक कारवाई पुण्यात झाली होती. यातच आता ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एफसी रोड हा पार्टी डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं. अनेक तरुण-तरुणी या या ठिकाणी शनिवार आणि रविवारी पार्टी करण्यासाठी, भेटण्यासाठी एकत्र येत असतात. यातच येथील एका नामांकित हॉटेलमधील हा प्रकार आहे. ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पहाटे तीन वाजेपर्यंत ही पार्टी सुरु होती, असं या व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओतच दिसत आहे. यात अनेक तरुण-तरुणी हे अल्पवयीन असल्याची शक्यात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांकडून या हॉटेलची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या हॉटेल मधील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. ज्या ठिकाणी पार्टी झाली त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT