Thane Crime news Saam Tv News
मुंबई/पुणे

'टॉयलेटला जाताना निळा शर्टवाल्यानं माझ्याशी..'; ठाण्यातील नामांकित शाळेत चिमुकलीसोबत गैरकृत्य

Thane latest Crime news: शहरातील एका नामांकित शाळेतील ४ वर्षांच्या चिमुकलीसोबत दुष्कृत्य झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती आईला कळताच त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल केली.

Bhagyashree Kamble

  • शहरातील नामांकित शाळेत ४ वर्षाीय चिमुकलीसोबत दुष्कृत्य

  • प्रकरणाची माहिती आईला कळताच पोलीस ठाण्यात धाव

  • पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल

ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील एका नामांकित शाळेत ४ वर्षांच्या चिमुकलीसोबत दुष्कृत्य झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चिमुकलीनं निळा टी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीनं जबरदस्ती केल्याचं आईला सांगितलं. त्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती आईला कळताच त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली ठाण्यातील नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी पीडित चिमुकली आणि तिची मैत्रीण बाथरूममध्ये जात होते. दोन्ही मुली बाथरूममध्ये जात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे. मात्र, त्यानंतर किंवा त्यांच्यासोबत कुणीही आत गेल्याचं दिसून येत नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पालकांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, ३० जुलै ११: १५ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान, हा सर्व प्रकार घडला. एका निळ्या कपड्यातील व्यक्तीनं चिमुकलीसोबत गैरकृत्य केलं. नंतर मुलीनं घरी आल्यानंतर आपल्या आईला आपबिती सांगितली, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

पीडितेच्या आईनं पहिल्यांदा मुलुंड येथील नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नंतर गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, त्यानंतर हे दुष्कृत्य ज्या शाळेत घडलं, ती शाळा ठाण्यात असल्यामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. दरम्यान, प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौकशीचा भाग म्हणून शाळेतील सीसीटीव्ही तपासले. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

Monsoon Rain : पावसात भिजल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी का?

SCROLL FOR NEXT