परमबीर सिंग २ महिने रजेवर Saam Tv
मुंबई/पुणे

परमबीर सिंग २ महिने रजेवर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप करून खळबळ माजवणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग हे २ महिन्यांच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप करून खळबळ माजवणारे मुंबईचे Mumbai माजी पोलीस आयुक्त व राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग Parambir Singh हे २ महिन्यांच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परमबीर सिंह हे चंदिगड Chandigarh येथे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  Parambir Singh on 2 months leave

हे देखील पहा -

चंदीगड मधील  एका स्थानिक रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर सिंग यांची प्रकृती  ठीक नसल्याचे समजत आहे. त्यामुळे परमबीर हे ५ मे पासून सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर आली आहे. पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवून परमबीर सिंग सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या कार्यालयाचा अतिरिक्त भार सिव्हिल डिफेन्सचे प्रमुख आयपीएस के व्यंकटेशन यांच्याकडे देण्यात आला आहे अशी माहिती  समोर आली आहे.

या दरम्यान, परमबीर सिंग या आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात मुंबई पोलीस खात्यातील काही पोलीस निरीक्षकांनी भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले आहे. यावरून सिंग यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. Parambir Singh on 2 months leave

मात्र, राज्याच्या गृहरक्षक दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर ५ मे पासूनच सिंग हे त्यांच्या कार्यालयात येत नसल्याचे समोर आले आहे. परमबीर सिंग यांच्यावर अट्रोसिटीसहित विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना जरी सध्या अटकेपासून संरक्षण मिळाले असले तरी येत्या काळात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT