दादरच्या चैत्यभूमीत गोंधळाचं वातावरण; पोलिसांना केली धक्काबुक्की...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

दादरच्या चैत्यभूमीत गोंधळाचं वातावरण; पोलिसांना केली धक्काबुक्की...(पहा व्हिडिओ)

मुंबईत चैत्यभूमीवर काही वेळेसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्याकरिता चैत्यभूमी, शिवाजी पार्क या ठिकाणी येत असतात. मात्र, मुंबईत चैत्यभूमीवर काही वेळेसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना पोलिसांनी रोखले होते.

पहा व्हिडिओ-

यामुळे काही अनुयायी संतापले. या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापटही झाली आहे. ऑल इंडिया पँथरचे कार्यकर्त्यांनी चैत्यभूमीच्या बाहेर गोंधळ घातला आहे. राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेत आहेत. त्याबरोबरच त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील त्यापद्धतीत दर्शन घेत होते. panic situation all india panther activists outside chaityabhoomi he pushed police

सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी बॅरिकेट्स तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला आहे. हे तरुण केवळ स्टंटबाजी करत असल्याचे आयोजन कर्त्यांचे सांगणे आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये असून तणावपूर्ण शांतता आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT