Devotees during Pandharpur Wari in Pune, where a gang allegedly used itching powder to distract and rob pilgrims. saam tv
मुंबई/पुणे

पालखीत वारक-यांना लुटणारे चोरकरी, पुण्यात वारीत चोरी, धास्तावले वारकरी, खाज-खुजली टाकून लुटणारी टोळी

Pandharpur Wari Devotees Looted Itching Powder Pune: पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना चोरट्यांनी गंडा घातलाय... खाज-खुजलीची पावडर टाकून चोरट्यांनी कसा डाव साधला? वारीत चोरट्यांचा सुळसुळाट झालेला असताना पोलीस प्रशासन नेमकं काय करत होतं? पाहूयात या रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

जे मुघलांनाही जमलं नाही, ते पुण्यातल्या मवाल्यांनी करून दाखवलंय. होय... विठू माऊलीच्या ओढीने आलेल्या भोळ्या-भाबड्या वारकऱ्यांना दिवसाढवळ्या लुटणाऱ्या एका निर्दयी टोळीने वारीत हैदोस घातलाय. पुण्यात वारीचा मुक्काम होता. मात्र याच मुक्कामात अंघोळीसाठी थांबलेल्या वारकऱ्यांना चोरांनी कंगाल केलं, निर्दयी युक्ती वापरून या लुटारुंनी वारकऱ्यांना कसं लुबाडलं ते ऐकलं तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. वाशीमवरून डोळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या किसन काळेंच्या डोळ्यात या लुटारुंनी अश्रू आणलेत....

मोठ्या भक्तीनं वारीत विठू नामाचा जयघोष करणाऱ्या वारकऱ्यासोबत जे झालं ते संतापजनक तर आहेच पण व्यवस्थेचे धिंडवडे काढणारं आहे. हे काही फक्त एकाच वारकऱ्यासोबत घडलेलं नाही तर कर्नाटकातून आलेल्या रुक्मिणी बाई बोबडे यांच्यासोबत जे घडलं त्यामुळे वारीत वारकऱ्यांना लुटण्यासाठी चोरकरी शिरल्यावर शिक्कामोर्तब झालंय. पाहा या माऊलीची व्यथा..

वारीच्या चोख नियोजनाचे ढोल बडवणाऱ्या प्रशासनाचे सर्व दावे या घटनेने उघडे पाडलेत. अंगावर खाजकुजलीची पावडर टाकून वारकऱ्यांचं लक्ष विचलित करायचं आणि त्यांचे कष्टाचे पैसे, मोबाईल लंपास करायचे... ही अत्यंत निर्घृण आणि सराईत पद्धतये. वारीतल्या गर्दीचा फायदा घेऊन, अंघोळीला जाणाऱ्या महिलांना आणि वृद्ध वारकऱ्यांना हेरून लुटणाऱ्या या टोळ्या पुण्यात धुमाकूळ घालत असताना पुणे पोलीस नेमके काय करतायेत असा प्रश्नये.

महाराष्ट्राला वारीची शेकडो वर्षांची पवित्र परंपराये.. इतिहासात अनेक जुलमी राजवटी आल्या, पण वारीत असं पाप करण्याची हिंमत कोणाचीही झाली नव्हती. आज मात्र या लुटारूंनी पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगली आहे. जर वारीत चोरांचा असा सुळसुळाट असेल, तर पुणे पोलिसांचे हायटेक सीसीटीव्ही, त्यांचे गुप्तचर आणि हजारो पोलिसांचा फौजफाटा नेमका कोणाच्या संरक्षणासाठीये? चोरांनी लुटलेल्या त्या वारकऱ्यांची आता वारी कशी होणार? या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडे आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT