palghar police charged builder kadam and his son after court order
palghar police charged builder kadam and his son after court order  Saam Tv
मुंबई/पुणे

Palhgar Crime News : भागीदाराला गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिक पिता-पुत्रावर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रुपेश पाटील

Palghar News :

बनावट दस्तावेज तयार करून आपल्या भागीदारालाच गंडा घालणाऱ्या पालघर मधील बांधकाम व्यावसायिक पिता पुत्रावर न्यायालयाच्या आदेशानंतर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाईट बाळासाहेब पाटील यांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पालघर मधील प्रसिद्ध असलेल्या जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक वागेश कदम आणि त्यांचा मुलगा प्रणव वाघेश कदम या पिता- पुत्रांवर पालघर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

कदम यांचे भागीदार गणपत राऊत यांनी पालघर न्यायालयात दाखल केलेले याचिके नंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले हाेते. त्यानूसार पाेलिसांनी कार्यवाही केली आहे.

पालघर मधील सत्तु ऑरा या कल्पातील 80 पैकी 58 सदनिकांची विक्री करण्यात आली असून यात कदम यांना कोणतेही अधिकार नसताना बेकायदेशीररित्या विक्री करून यातून जवळपास एक कोटी 57 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं समोर आल आहे. या प्रकरणात सध्या पालघरची आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून याबाबत कार्यवाही सुरू असल्याचा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

EPF Balance: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

SCROLL FOR NEXT